सौरभ कुंडलिक यांची युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड.


औंध, ता. ६ : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळणारे औंध येथील युवा कार्यकर्ते सौरभ पोपट कुंडलिक यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पुणे विभागाला प्रदेश कार्यकारिणीत प्रतिनिधित्व मिळाले आहे.

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार युवा मोर्चाचे प्रदेश प्रभारी सुनील राणे आणि प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत पुणे विभागातून कुंडलिक यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

कुंडलिक यांनी यापूर्वी शिवाजीनगर युवा मोर्चाचे अध्यक्ष, पुणे शहर उपाध्यक्ष तसेच युवा मोर्चाचे प्रदेश सचिव म्हणून काम पाहिले आहे. पक्षातील त्यांच्या यापूर्वीच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत

आहे.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!