खडकवासला धरण जलाशयाला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव; एप्रिल २०२७ मध्ये विशेष कार्यक्रम.


खडकवासला धरण जलाशयाला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव; एप्रिल २०२७ मध्ये विशेष कार्यक्रम

 

द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त जलसंपदा विभागाचा उपक्रम; स्मृतिपीर मुख्य कार्यक्रमासह माहितीपट आणि स्मरणिकेचे प्रकाशन

 

पुणे : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणाच्या जलाशयाला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. एप्रिल २०२७ मध्ये यासंदर्भात विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कृषीविषयक योगदानाचे स्मरण करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने खडकवासला धरणाशी संबंधित हा नामकरणाचा प्रस्ताव पुढे आणला आहे.

 

या उपक्रमांतर्गत स्मृतिप्रीत्यर्थ मुख्य कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन असून, महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

 

पुणे शहर आणि परिसराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने खडकवासला धरण महत्त्वाचे आहे. खडकवासला धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलव्यवस्थेचे विशेष महत्त्व आहे. अशा महत्त्वाच्या जलाशयाला महात्मा फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव हा त्यांच्या स्मृती जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम ठरू शकतो.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!