पुणे मेट्रोची १७ स्थानके ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी खुली; माण ते जिल्हा न्यायालयापर्यंत धावणार मेट्रो!


हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात; सकाळी ६ वाजल्यापासून प्रवाशांना सेवा

 

पुणे : पुणेकरांच्या बहुप्रतीक्षित हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील १७ स्थानके ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी खुली होणार आहेत. माण ते जिल्हा न्यायालय या मार्गावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे.

 

हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर जिल्हा न्यायालयादरम्यान प्रस्तावित असलेल्या या मेट्रो मार्गिकेवर एकूण २३ स्थानके आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १७ स्थानकांवर मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.

 

ही १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली होणार

 

माण, माण एमआयडीसी सर्कल फेज-२, माण बस डेपो, हिंजवडी फेज-२ सर्कल-२, हिंजवडी फेज-२ सर्कल-१, पद्मभूषण चौक, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी फेज-१, वाकड चौक, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, मिटकॉन बालेवाडी, आर. के. लक्ष्मण म्युझियम बालेवाडी, औंध, सकाळनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कृषी महाविद्यालय आणि जिल्हा न्यायालय.

 

या मेट्रो सेवेमुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच बाणेर, बालेवाडी, औंध आणि परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासह दैनंदिन प्रवासाचा वेळ वाचण्यास या मार्गिकेची मदत होऊ शकते.


भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

15
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

error: Content is protected !!