अपूर्ण कामांचे उद्घाटन कशासाठी? बाणेरमध्ये मेट्रोविरोधात राजकीय पक्षांचे आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.


बाणेर-बालेवाडीतील सहा मेट्रो स्थानकांची कामे अपूर्ण असल्याचा आंदोलकांचा आरोप; मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी

 

पुणे : हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही मेट्रो सेवेच्या उद्घाटनाचा घाट घातला जात असल्याच्या निषेधार्थ बाणेर येथे विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या आवश्यक मंजुऱ्या अद्याप मिळालेल्या नाहीत. तसेच बाणेर-बालेवाडी परिसरातील सहा मेट्रो स्थानकांची कामेही अपूर्ण आहेत. असे असताना अपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची घाई कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अपूर्ण कामांचे उद्घाटन करण्याच्या प्रकाराचा तीव्र निषेध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनीही सरकारच्या भूमिकेवर टीका केली. बाणेर-बालेवाडी परिसरातील अनेक विकासकामे अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत. त्यात आता मेट्रोच्या अपूर्ण कामांची भर पडली आहे. स्थानिक आमदार कॅबिनेट मंत्री असूनही स्वतःच्या मतदारसंघातील विकासकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांना प्रत्यक्ष सुविधा मिळण्यापेक्षा उद्घाटन समारंभांना अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

 

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश बालवडकर, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष ओम बांगर, सामाजिक कार्यकर्ते अमर लोंढे, लक्ष्मण पाडाळे, रोहित धेंडे आदी सहभागी झाले होते.

 

अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून मेट्रो सेवा नागरिकांसाठी पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.


भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

15
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

error: Content is protected !!