सावधान पुणेकर! दिवाळीची मिठाई खरेदी करताय? FDA चा छापा; १,१८८ किलो मोतीचूर लाडू-बुंदी नष्ट, उत्पादन परवानाही निलंबित.


पुणे : दिवाळीनिमित्त बाजारातून मिठाई खरेदी करत असाल, तर जरा सावध व्हा! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या मिठाई उत्पादकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील मे. गायत्री लाडू भांडार या मिठाई उत्पादन व साठा केंद्रावर छापा टाकण्यात आला.

या कारवाईदरम्यान भेसळयुक्त अथवा अपमिश्रित असण्याची शंका असलेले १,००८ किलो मोतीचूर लाडू आणि १८० किलो मोतीचूर बुंदी, असा एकूण १,१८८ किलो साठा आढळून आला. सुमारे १ लाख ७३ हजार ७०० रुपये किमतीचा हा मिठाई साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच संबंधित उत्पादनाचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.

मंत्रीस्तरीय प्रशासनिक देखरेखीखाली सुरू असलेल्या या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर FDA ने मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांना कडक इशारा दिला आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे किंवा निकृष्ट दर्जाच्या रंगांचा वापर करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दिवाळीसाठी मिठाई खरेदी करताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. केवळ स्वस्त दर किंवा आकर्षक रंग पाहून मिठाई खरेदी करू नये. परवानाधारक आणि विश्वासार्ह दुकानातूनच मिठाई घ्यावी. मिठाईचा रंग, वास, ताजेपणा आणि स्वच्छता तपासावी. संशयास्पद किंवा निकृष्ट दर्जाची मिठाई आढळल्यास FDA कडे तक्रार करावी.

दिवाळीचा गोडवा आरोग्यासाठी कडू ठरू नये, यासाठी पुणेकरांनी मिठाई खरेदी करताना सतर्क राहणे आवश्यक आहे.


भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

15
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

error: Content is protected !!