व्यापाऱ्यावर धारदार हत्याराने वार करून रोकड लुटण्याचा प्रयत्न; दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त.


पुणे : सॅलिसबरी पार्क परिसरातील गोलिवाला भवन येथे व्यावसायिकाची पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न करताना त्यांच्यावर धारदार लोखंडी हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करत स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

 

पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान अटक केलेल्या आरोपींनी मार्केटयार्ड परिसरात एका व्यापाऱ्याची ३० लाख रुपये रोकड असलेली बॅग लुटल्याची कबुली दिली. त्यामुळे या दोन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

या कारवाईत पोलिसांनी चारचाकी व दुचाकी वाहने, मोबाईल फोन, सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे आणि सहा लाख ५० हजार रुपये रोख असा एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

या प्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, अटक केलेल्या आरोपींचा अन्य गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!