नवरात्रोत्सवात बाणेरच्या कीर्तिशक्ती फाउंडेशनतर्फे अनोखे सरस्वती पूजन; शाळेच्या वाचनालयाला पुस्तकभेट.


बालेवाडी : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून कीर्तिशक्ती फाउंडेशन, बाणेर यांच्या वतीने बालेवाडी येथील पीएमसी शाळा क्रमांक १५२ (ब) च्या वाचनालयासाठी विविध विषयांवरील पुस्तकांची भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे ज्ञान समृद्ध व्हावे आणि शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

 

या पुस्तकभेटीत मराठी साहित्य, लोकसाहित्य, महान व्यक्तिमत्त्वांची चरित्रे, आत्मचरित्रे, बाल व किशोर साहित्य, भूगोल, कविता आणि कथासंग्रह अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश होता. यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचाही पुस्तकभेट देऊन सन्मान करण्यात आला.

 

फाउंडेशनच्या संस्थापक कल्याणी टोकेकर यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

 

या उपक्रमासाठी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका शोभा घोरपडे, मुख्याध्यापिका मनीषा केडकर आणि सर्व शिक्षकवृंद यांचे विशेष सहकार्य लाभले. फाउंडेशनतर्फे  शिखा नीखरा,  अंशिका राय आणि  अभय बागल यांची यावेळी उपस्थिती होती.

 

पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानाची गोडी वाढविणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. नवरात्रोत्सवात ज्ञानदेवता सरस्वतीच्या पूजनाला पुस्तकभेटीची जोड देत फाउंडेशनने शिक्षण आणि वाचनसंस्कृतीचा जागर केला.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!