सुप्रिया सुळेंचा म्हाळुंगे दौरा; जयेश मुरकुटे फाउंडेशनकडून पाटोळे कुटुंबीयांना १ लाखांची मदत.


पुणे : म्हाळुंगे येथील रस्ता अपघातात ११ वर्षीय विराज पाटोळे याचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर पाटोळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटोळे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी जयेश मुरकुटे फाउंडेशनच्या माध्यमातून पाटोळे कुटुंबीयांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

 

विराजच्या अकाली निधनाने दुःखी झालेल्या पाटोळे कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याच्या उद्देशाने ही मदत करण्यात आली. या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना आधार देण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे जयेश संजय मुरकुटे यांनी सांगितले.

 

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातील म्हाळुंगे (ता. मुळशी) येथील व्हिटीपी अल्पाइन सोसायटी तसेच म्हाळुंगे टाऊनशिप परिसरातील विविध सोसायट्यांमधील सभासदांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी परिसरातील विविध प्रश्न व तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. या समस्या जाणून घेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन सुळे यांनी दिले.

 

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, दगडूकाका कारंजावणे, जयेश मुरकुटे, निलेश पाडळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!