शनिवारवाड्यात ३६ हजार दिव्यांतून साकारणार ‘वंदे मातरम्’ची अक्षररचना; पुण्याच्या नावावर विश्वविक्रमाची तयारी!


शनिवारवाड्यात ३६ हजार दिव्यांतून साकारणार ‘वंदे मातरम्’ची अक्षररचना; पुण्याच्या नावावर विश्वविक्रमाची तयारी!

 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्याचा पुणे महापालिकेचा प्रयत्न; ७ नोव्हेंबरला ऐतिहासिक दीपोत्सव

 

पुणे : ‘वंदे मातरम्’ गीताच्या सार्धशताब्दी महोत्सवानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात भव्य देशभक्तिपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात तब्बल ३६ हजार दिवे प्रज्वलित करून त्यातून ‘वंदे मातरम्’ ही अक्षररचना साकारण्यात येणार आहे. या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये पुणे शहराच्या नावाची नोंद करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

या उपक्रमामुळे शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक वास्तूला देशभक्तीच्या दीपोत्सवाचे भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे. हजारो दिव्यांच्या प्रकाशातून साकारली जाणारी ‘वंदे मातरम्’ ही अक्षररचना पुणेकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय सांस्कृतिक वारशाचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.

 

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी या ऐतिहासिक उपक्रमात पुणेकरांनी एकजुटीने सहभागी व्हावे आणि या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन केले आहे.

 

पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा दीपोत्सव शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरणार का, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.


भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

15
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

error: Content is protected !!