बाणेरमधील वाहतूक कोंडीवर उपायासाठी प्रत्येक चौकात ट्राफिक पोलिसांची मागणी.


बाणेर : बाणेर-बालेवाडी परिसरात सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बाणेर परिसरातील प्रत्येक प्रमुख चौकात किमान एक वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात यावा, अशी मागणी बाणेर ट्रॅफिक डिव्हिजन सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली.

 

बाणेर येथे मंगळवारी, २९ सप्टेंबर २०२६ रोजी बाणेर ट्रॅफिक डिव्हिजन सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी वाहतूक शाखेचे एसीपी वसंत कुवर, पोलीस निरीक्षक जगदाळे, ॲड. संजीव जाधव पाटील यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

 

बैठकीत परिसरातील वाहतूक व्यवस्थेबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ॲड. संजीव जाधव पाटील यांनी बाणेर-बालेवाडी परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. सकाळी कार्यालयीन वेळेत तसेच सायंकाळी नागरिकांची मोठी वर्दळ असते. यावेळी अनेक चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

 

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गर्दीच्या वेळेत प्रत्येक प्रमुख चौकात किमान एक वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करावा, अशी मागणी ॲड. जाधव पाटील यांनी केली.

 

दरम्यान, बाणेर वाहतूक पोलीस विभागाकडे मनुष्यबळाची संख्या तुलनेने कमी असल्याने उपलब्ध पोलिसांवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे पुणे शहर पोलीस आयुक्तांनी बाणेर वाहतूक विभागासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

 

बैठकीच्या शेवटी पोलीस निरीक्षक जगदाळे यांनी उपस्थित सदस्यांचे आभार मानले.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!