पुण्यातून मान्सून बाहेर; महाराष्ट्रातील उर्वरित भागांतूनही माघारीला वेग येणार.


पुणे : महाराष्ट्रातून नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) परतीला सुरुवात झाली असून, मुंबई, पुण्यासह उत्तर कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांतून शनिवारी (३ ऑक्टोबर) मान्सूनने माघार घेतली आहे. महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे बाहेर पडण्याचा सर्वसाधारण कालावधी ३ ते १४ ऑक्टोबर असा असल्याचे ‘Sanshodhan’च्या ३ ऑक्टोबरच्या मान्सून अपडेटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

परतीच्या मान्सूनची दक्षिण सीमा सध्या सुपौल, रांची, रायपूर, ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि हर्णे या भागांतून जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उर्वरित भागांतूनही आगामी काळात मान्सूनची माघार सुरू राहण्याची शक्यता आहे.

पुढील २ ते ३ दिवसांत महाराष्ट्रातील आणखी काही भागांतून मान्सून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, राज्यात हळूहळू कोरडे हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!