
मुळशी : मुळशी तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करून तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी मुळशी तालुका शेतकरी संघाच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन आज तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्याकडे देण्यात आले.
तालुक्यातील पावसाची स्थिती, पिकांवर होणारा परिणाम तसेच शेतकऱ्यांसमोरील अडचणी लक्षात घेऊन शासनाने मुळशी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सवलती व मदतीचा लाभ मुळशीतील शेतकऱ्यांनाही मिळावा, अशी भूमिका शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
यावेळी सभापती मंदाताई शेळके, उपसभापती दगडूकाका करंजावने, पंचायत समिती सदस्य राहुल पवळे, प्रवीण धनवे, ऐश्वर्या वाघमारे तसेच शेतकरी संघाचे राजेंद्र मारणे, राम गायकवाड, लहू चौहान, भाऊ केदारी, महादेव मरगळे, संतोष साठे, लक्ष्मण निकटे, दत्ता उभे आणि दत्ता मारणे उपस्थित होते.








