द औंध सोशल फाउंडेशनमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती


औंध : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर औंध सोशल फाउंडेशनच्या कार्यालयातील श्री गणरायाची आरती आज भक्तिमय वातावरणात पार पडली. प्रभाग समिती अध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी ताई चिमटे आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.

यावेळी नगरसेविका भक्ती गायकवाड, अभिजीत गायकवाड यांच्यासह औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच द औंध सोशल फाउंडेशनचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश आरतीनंतर उपस्थितांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!