औंधमध्ये ज्येष्ठ महिलेचे ३ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले; दुचाकीस्वार फरार.


सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फ्रेशसमोरील गल्लीत घटना; चतु:शृंगी पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू

 

पुणे : औंध परिसरात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सुमारे ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी (२० ऑक्टोबर) सकाळी घडली. या घटनेमुळे औंध परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औंध येथे राहणाऱ्या ७० वर्षीय महिला सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सुमन सॉफ्टलिंक इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीजवळील सिग्नल मॉल रोडला जोडणाऱ्या गल्लीतून जात होत्या. रिलायन्स फ्रेशसमोरील परिसरात त्या पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या जवळ येत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

 

या मंगळसूत्राची किंमत सुमारे ३ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला घाबरल्या. घटनेनंतर त्यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास

 

घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित दुचाकीस्वाराची ओळख पटवण्याचे तसेच दुचाकीचा क्रमांक शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

या प्रकरणाचा पुढील तपास चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

पुणेकरांसाठी आवाहन : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी निर्जन रस्त्यांवरून जाताना सतर्क राहावे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!