भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


बाणेर : दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त बाणेर येथे भक्तिसंगीत आणि सुरेल गीतांच्या मैफलीने दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात पार पडला. गणेश कळमकर आणि माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि संगीतप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

या संगीत सोहळ्यात सुप्रसिद्ध गायक उपेंद्र भटजी, इंडियन आयडॉलचे सहविजेते जगदीश चव्हाण आणि सुप्रसिद्ध गायिका कृपा नाईक यांनी आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. भक्तिगीते आणि सुरेल संगीताच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात रंगलेल्या या संगीत मैफलीचा नागरिकांनी मनमुराद आनंद घेतला.

 

या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राजेश पांडे, बाणेर-बालेवाडी-औंध भागाचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, बाणेर-बालेवाडी भागाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह संजय वाघुळदे, डॉ. राजेश पांडे, माजी पोलीस अधिकारी अजय कदम, धनंजय केवटे, पराग जोशी, उमाताई गाडगीळ, पांडुरंग तात्या कळमकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

 

दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून संगीत, भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे परिसरातील नागरिकांना एकत्र येण्याची आणि भारतीय परंपरांचा आनंद घेण्याची संधी मिळत आहे.

 

नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दिवाळी पहाट कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मानण्यात आले.


भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

15
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

error: Content is protected !!