क्रीडा विश्वाची प्रत्यक्ष ओळख; आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची श्री छत्रपती शिवाजी स्टेडियमला भेट.


पुणे ( बाणेर ) : बाणेर येथील श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलमधील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची महाळुंगे-बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलाला शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकार तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधांची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळाली.

क्रीडा संकुलातील विविध मैदानांची आणि क्रीडा सुविधांची माहिती श्री छत्रपती शिवाजी स्टेडियमचे अधिकारी योगेश शिर्के यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी धावपट्टीवर विद्यार्थ्यांसाठी धावण्याची शर्यत घेण्यात आली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. हॉकीच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धाही विद्यार्थ्यांनी उत्साहाने पाहिल्या.

जलतरण तलावाची माहिती घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक हॉलला भेट दिली. या ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लॉन टेनिस या खेळाचीही विद्यार्थ्यांना विशेष माहिती देण्यात आली.

विविध खेळांची माहिती प्रत्यक्ष मैदानावर मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. क्रीडा क्षेत्रातील विविध संधी आणि खेळांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून घेता आले.

या शैक्षणिक भेटीदरम्यान संस्थेचे सचिव विराज धनकुडे, सीईओ सुषमा भोसले, मनोज पवार यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांची माहिती देत मार्गदर्शन केले. योगेश शिर्के यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!